आव्हन चिनी ड्रगनचे
लेखक : लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 200.00 Rs.180.00

eBook Price : Rs. 200       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 208

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 200 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. या आव्हानाचे सर्वंकष स्वरूप स्पष्ट करणारे तसेच या संदर्भात वस्तुस्थिती उलगडणारे तसेच देश व सहकार म्हणून आपण भोगती भूमिका घेऊन कशी पावले उचलायला हवी, यांचे सोपे मार्गदर्शन करणारे मराठीतील एकमेव महत्वपूर्ण पुस्तक.

Reviews

चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान
 चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान हे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, नचिकेत प्रकाशननी प्रकाशित केलेले,1962 चे चीनी आक्रमण, भारत चिनसंबधाचे आजचे स्वरुप, 2015-20 साली चीनसोबत युद्ध होईल का? असे अनेक पैलु सांगणारे सुबोध पुस्तक आहे.ब्रिगेडियर हेमंत महाजन यांना संरक्षण दलामधील 37 वर्षांच्या सेवेची पार्श्वभूमी आहे.
आपण चीनच्या पुढे  नेहमिच गुडघे का टेकतो? चिनशी चर्चेतून काही निष्पन्न झाले आहे का? भारताची कुरापत काढणे सोपे आहे म्हणुन भारताला शह देऊन चीन जगाला आपण महासत्ता असल्याचा ईशारा देत आहे. चीन अभ्यास गट विशेषज्ञ आपण चिनशी कसे वागावे हे ठरवतात. त्यांच्या मनात तर चिनने घुसखोरी तर केली नाही? आपण चीनशी सामना करु शकत नाही असे त्यांना का वाटते.
1962 चे चीनी आक्रमण व आपले अपयश आपल्या सेनेचे नाही तर नेत्यांचे होते. 1962 च्या घोडचुकांपासून आपण काही शिकलो का? नव्या चीनी नेतृत्वाचा, भारताच्या धोरणात काही बदल झालेला दिसत नाही. व्यापार वाढवला की चीनचा आक्रमकता नाहीशी होईल का? 90टक्के भारतीयांचे मते चीन  सुरक्षेच्या चिंतेचा विषय वाटतो.
भारतीम द्वीपकल्पाभोवती  मोत्माची (नाविक तळाची) माळ चीन प्रस्थापित करत आहे. चीनभोवती भारतानेही आपला विळखा मजबूत करणे गरजेचे आहे. चीनला रोखण्याकरता जपान, व्हिएतनाम, तैवान आणि ईतर अनेक देशाची सामरिक भागीदारी करणे जरुरी आहे.
एकाच वेळी चीन, पाकिस्तान, दहशतवादी, माओवाद्यांशी युद्ध लढण्याची तयारी आवश्यक आहे. चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी पळवतोय. चीनची आर्थिक घुसखोरी आणी बाजारपेठेत आक्रमण थाबंले पाहीजे. भारताच्या शेजार्‍यांशी मैत्री दृढ करण्यावर चीनचा भर आहे. भारत मात्र अंतर्गत सुरक्षेच्या चक्रव्युव्हात अडकला आहे. चीनमधील अंतर्गत कलह पण वाढतो आहे. चीनच्या मानवी हक्क धोरणाविरुद्ध आपण आवाज का ऊठवत नाही. तिबेट, सिकयांग, तैवान येथील स्वातंत्र्य चळवळी चिनचे मर्मस्थान आहे.
आपला चीनसंबंधीचा 1962 चा कटू अनुभव बिलकूल न विसरता भारताने एकात्मिक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हाला युद्ध टाळायचं असेल तर युद्धाकरता सक्षम व सज्ज राहा. त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लष्कराची, संरक्षणसामग्रीची सिद्धता आणि डावपेचांच्या आघाडीवरील प्रयत्नांना राजकीय नेतृत्वाच्या कणखर भूमिकेची जोड मिळाली, तर चीनचे आव्हान परतविणे भारताला मुळीच कठीण जाणार नाही. राजकीय नेतृत्वाचे सर्वात महत्वाचे काम असते राष्ट्रीय सुरक्षितता. जे राजकीय नेतृत्व देश सुरक्षित ठेवु शकत नाही त्याना राज्य करण्याचा अधिकार नाही.
चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान बद्दल काही इंग्रजी पुस्तके आहेत. मराठीत मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीही नाहीत. ब्रिगेडियर हेमंत महाजननी बराच रिसर्च करून हे पुस्तक लिहिले आहे. चिनच्या उपद्रवी कारवाया करणार्‍याविषयी जनमानस जागृत करण्याचा खारीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा आहे. ती पुरी करण्याचा प्रयत्न किती यशस्वी झाला आहे हे वाचकांनी ठरवायचे. अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती, भरपूर आकडेवारी, नकाशे आणि चित्रे यांनी हे पुस्तक अधिकच समृद्ध झाले आहे. इतके उत्तम पुस्तक नचिकेत प्रकाशनाने जाणीव पूर्वक प्रसिद्ध केले आहे. संरक्षण विषयावरील नक्षलवादाचे आव्हान, भारतीय स्थल सेना, भारतीय परमवीर, 1971 ची युद्धगाथा आणि पाणबुडीचे विलक्षण जग ही पाच पुस्तके नचिकेत ने या आधी प्रकाशित केली आहे. लेखक प्रकाशक यांचे अभिनंदन
चिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान  : ब्रिगे्रडियर हेमंत महाजन
पृष्ठ : 208, किंमत : 200 रू.   
प्रकाशक :     नचिकेत प्रकाशन, मो. : 9225210130

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: