भारतीय शिल्पशास्त्र
लेखक : लेखक : डॉ. अशोक नेने
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 100.00 Rs.90.00

eBook Price : Rs. 100       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 104

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

प्राचीन भारतीयांची विज्ञानातील प्रगती किती व्यापक होती. यातील 14 विद्या व 64 कोणत्या? त्यात कोणकोणत्या विचारांचा सखोल अभ्यास केला गेला आहे. त्यावरील लिहिली गेलेली विपुल शास्त्रीय ग्रंथसंपदा, यांची माहिती देऊन या विषयांचा परिचय करून देणारे मराठीत पहिले व एकमेव पुस्तक. भारताच्या विज्ञान परंपरेचा अभिमान बाळगणाऱ्यांनी तसेच न बाळगणाऱ्यांनीही आवर्जून वाचावे असे पुस्तक.

Reviews

प्राचीन शास्त्रांची समृद्धी दाखविणारे भारतीय शिल्पशास्त्रे
भारतीयांची प्राचीन 10 शास्त्रे, 32 विद्या व 64 कला यांचा साधार परिचय करून देणारे भारतीय शिल्पशास्त्रे हे पुस्तक डॉ.अशोक नेने यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व परिश्रमपूर्वक लिहिले असून नागपूर च्या नचिकेत प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
या पुस्तकातील माहितीचा दर्शन घडविणारा हा लेख पुस्तकाच्या लेखकानेच लिहिला आहे. त्यावरून या पुस्तकांच्या संदर्भ मूल्याची कल्पना सहज यावी. प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचले पाहिजे व संग्राह्य ठेवले पाहिजे असे हे उत्तम पुस्तक आहे अशा या पुस्तक निर्मितीसाठी लेखक व प्रकाशक दोघांचेही अभिनंदन!
प्राचीन भारतीय शिल्पसंहिता आणि मराठी म्हणी किंवा वाकप्रचार
प्राचीन भारतीय शिल्पशास्त्रे या पुस्तकाच्या लिखाणासाठी असंख्य शिल्पसंहिता त्यावरील पुस्तके व लेख यांचा संदर्भ घ्यावा लागला. हे संदर्भ वाचत असतांना असे लक्षात आले की, मराठीतील अनेक म्हणी किंवा वाक्‌प्रचार यांचा उगम हा शिल्पग्रंथ आहे. वाचकांना या ग्रंथांचा परिचय व्हावा म्हणून हा लेख प्रपंच.
महर्षी भृगुनी प्राचीन शिल्पग्रंथाची 10 शास्त्रे, 32 विद्या व 64 कलांमध्ये विभागणी केली आहे. त्या दहा शिल्पशास्त्रांसंबधी म्हणी किंवा वाक्‌प्रचार अशा.
कृषी शास्त्र (वृक्षविद्या) ङ्गपेरावे तसे उगवतेङ्घ कृषीशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे कृषीपाराशर, काश्यप संहिता.
कृषी पराशर मध्ये बी कसे पेरावे, त्याचे वर्णन आहे. काही बिया पाण्यात भिजवून पेराव्या तर काही बिया शेणात 3 दिवस ठेवून मग  पेराव्या, असे वर्णन आहे. असे केल्यास झाडे लवकर उगवतात.
नगररचनाशास्त्र : ङ्गआधि जल मग स्थलङ्घ किंवा ङ्गआधी पाणी मग बोलणीङ्घ नगररचनाशास्त्र पहिला नियम म्हणजे जिथे मुबलक पाणी आहे, अशाच ठिकाणी गावे किंवा शहरे वसवावीत. प्राचीन भारतातील बहुतेक सर्व शहरे नदी काठी वसवली आहे. नागपुरातील काही वसाहती तर या नियमाकडे संपूर्ण काणाडोळा करून बांधल्या गेल्या आहेत. विदर्भातील काही गावात पाण्याचे एवढे दुर्भीक्ष आहे की त्या गावातील मुलगा आपल्या मुलींसाठी लोक नापसंत करतात.
खनिशास्त्र : ङ्गदगडापेक्षा विट मऊङ्घ दक्षिण भारतातील काळ्या दगडातून कोरून केलेल्या मूर्ती पाहिल्या की मन आश्र्चर्यचकित होते. प्राचीन काळी भारतीय मूर्तीकारांना दगडी कोरीव काम करण्यायोग्य मऊ (तात्पुरता) कसा करावे, याचे ज्ञान होते. दगडासाठी कोणते काढे (रसायने) वापरावीत, याचे वर्णन मयसंहिता व भृगुसंहिता व बृ्रहतसंहिता सारख्या शिल्प ग्रंथात सापडते.
खनिशास्त्र : ङ्गमाझा शब्द म्हणजे वज्रलेपङ्घ वज्रलेप म्हणजे वज्रासारखा कठीण. दगडी शिल्प हजारो वर्ष टिकून रहावे म्हणून विशिष्ठ प्रकारचे लेप मूर्तीवर चढवतात. अशा लेपातील घटक द्रव्ये व लेप कसा करावा याचे वर्णन बृहतसंहिता किंवा मय संहिता अशा शिल्पग्रंथात सापडते. ठराविक वर्षांनी पंढरपूरच्या विठोबा रखमाईच्या मूर्तींना (विशेषत: पायांना) वज्रलेप चढवला जातो.
कृषीशास्त्र-मनुष्य विद्या :
1. "खाण तशी माती". मनुष्य प्राण्याचे शारीरिक व मानसिक गुणधर्म अनुवंशिक असतात. आधुनिक विज्ञानशास्त्रात त्याला वंशशास्त्र (अपींहीेिेश्रेसू) असे म्हणतात. या विषयावर विवेचनाचार्य ऋषींचा लोकसंग्रह नावाचा ग्रंथ आहे. ज्यात वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचे गुणधर्म, त्यांचा पोषाख व अन्न वगैरे गोष्टींचे वर्णन आहे.
2. "नावात काय आहे?" (नाही) बालकाचे नाव त्याच्या जन्मनक्षत्रावरून ठेवण्याचा आपल्या देशात प्रघात आहे. बालकाच्या नावावरून त्याचे व्यक्तित्व घडते. अत्रि ऋषीचा नामार्थकल्पम नावाचा या विषयावर एक शिल्पग्रंथ आहे. नावामध्ये गूढ शक्ती दडलेल्या असतात. बालकाचे नाव ठेवण्या अगोदर त्या नावात काय अर्थ अभिप्रेत आहे हे समजणे आवश्यक आहे, असे या ग्रंथात सांगितले आहे.
जलशास्त्र : पाणी उताराकडेच वाहणार किवा ङ्गवळचणीचे पाणी आढ्या गेलेङ्घ (विरोधाभास) पाणी नेहमी उंच भागाकडून खोल भागाकडे वाहते. पाण्याचा हा व इतर 21 गुणधर्म वसिष्ठ ऋषींनी आपल्या वसिष्ठ संहिता या ग्रंथात सांगितले आहेत. हे गुणधर्म आजच्या आधुनिक जलशास्त्राच्या नियमांशी तंतोतंत जुळतात.
वास्तुशास्त्र :
1. "गुण्यागोविंदाने रहा."  घरांच्या भिंतींचे कोपरे काटकोनात असावेत व भितींचा पृष्ठभाग ओळंब्यात असावा असा नियम आहे व अशी घरे अनेक वर्षे टिकतात. भिंतीचे कोपरे काटकोनात आहेत किंवा नाहीत त्यासाठी गुण्या, भिंती ओळव्यात आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी ओळंबा (गोविंद) वापरतात.
2. "दुर्जनाचा संग नसावा शेजारी" वास्तुशास्त्राप्रमाणे पर्यावरण म्हणजे सहा गोष्टींचा शेजार (मनुष्य, प्राणी,पक्षी, वृक्ष, पाणी व जमिन यांचा) व हवामानानुसार त्यात होणारा बदल. या सहाही गोष्टीतील इष्ट व अनिष्ट गोष्टी शिल्पग्रंथात सविस्तरपणे सांगितल्या आहेत. शेजारी शेजारी रहाणाऱ्या व्यक्तींचे आचार विचार सारखे असावे, म्हणजे सहवास सुखाचा होतो. असे सांगितले.
3. "व्यक्ती डोईंजड होणे" भिंत बांधतांना खालच्या थरातील दगडापेक्षा मोठे दगड वरच्या थरात वापरले तर ती भिंत डोईजड होते व ती कमी टिकाऊ असते. अशी चूक करणाऱ्या कारागीराला दंड करावा, असे शिल्पग्रंथात आढळते.
युद्ध शास्त्र :
1. "ना घरी शस्त्र करी मी". महाभारताच्या प्रारंभी श्रीकृष्णाने मी हाती शस्त्र धरणार नाही, अशी घोषणा केली व कौरव गाफिल राहिले. हाती धरतात ते शस्त्र जसे धनुष्यबाण, भाला, गदा वगैरे पण अस्त्र म्हणजे जे शत्रूवर फेकून मारतात ते. अस्त्राने कल्पना करता येणार नाही, अशी शत्रुपक्षाची हानी होते. महाभारतात श्रीकृष्णाने शस्त्र वापरले नाही तरी पण अस्त्राचा (सुदर्शन चक्राचा) वापर केला. विविध शस्त्रे व अस्त्रे यांचे वर्णन युक्तिकल्पतरू या ग्रंथात आढळते. त्यातील कांही अस्त्रांचे वर्णन आजच्या अत्याधुनिक अस्त्रांशी व युद्धपद्धतीशी मिळते जुळते आहे. उदा. स्ट्रिंगर मिसाईल, रासायनिक अस्त्रे वगैरे.
2. "भिंतीलाही कान असतात" आपल्यावरही इतर जण पाळत ठेवत असतील, असे समजून वेडा, मुका, बहिरा, माणुस, स्त्रिया व अनोळखी व्यक्तीसमोर महत्वाच्या विषयावर चर्चा करू नये, असे शिल्पशास्त्रात सांगितले आहे. समोरील व्यक्ती अशी चर्चा करत असेल तर ही म्हण सांगून त्याला सावध करतात.
यंत्रशास्त्र : "नशिबाचा फेरा, कधी वर तर कधी खाली" यंत्रशास्त्रावरील एक ग्रंथ नीतिशास्त्र यांत पाणचक्क्यांचे वर्णन  "भरलेली भांडी रिकामी होतात व रिकामी भांडी परत भरतात, जसे दैवाचा फेरा"  असे केले आहे.
मोजक्या शब्दातून मोठा आशय सांगणाऱ्या अशा असंख्य म्हणी व वाक्‌प्रचार मराठी भाषेत उपलब्ध आहेत. या सर्वाचा उगम शोधणे बोधप्रद व मनोरंजकही ठरेल.
भारतीय शिल्पशास्त्रे : डॉ. अशोक नेने                                                                                              डॉ. अशोक नेने
नचिकेत प्रकाशन : पृ. 104, कि. 100/- रू.                                                                                      निवृत्त प्राध्यापक,
नचिकेत प्रकाशन : 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15,भ्र.9225210130        व्ही.एन.आय.टी., नागपूर
Email : [email protected]                                                                            2222216

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: