भारतीय वैज्ञानिक
लेखक : लेखक : डॉ. मधुकर आपटे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 130.00 Rs.117.00

eBook Price : Rs. 130       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 112

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 125 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

भारताच्या विज्ञान क्षेत्रातील गौरवशाली परंपरेचा परिचय करून देणारे हे पुस्तक आहे. प्राचीन काळातील कणादापासून ते आजचे डॉ. नारळीकर-भटकर पर्यंतच्या निवडक 25 महान भारतीय शास्त्रज्ञांचा सोप्या व ओघवत्या भाषी परिचय करून दिला आहे. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मधुकर आपटे यांनी

Reviews

गौरवशाली प्रगत संशोधन करणारे
भारतीय वैज्ञानिक
        अनेक शतके भारत विविध आक्रमणांना तोंड देत राहिल्याने या देशात औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली स्थिरता आणि शांतता नव्हती. सतत लढाया, अशांतता होती. यामुळे मधल्या काळात येथे संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. मात्र तरीही वैदिक काळात व नंतरही भारतात विविध विषयांवर संशोधन झाले होते. त्याकाळी व त्यानतर भारताने संशोधन क्षेत्रात केलेल्या गौरवशाली प्रगतीची ओळख करून देणारे काही साहित्य जाणीवपूर्वक प्रकाशित होत असते.  नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले डॉ. मधुकर आपटे यांचे "भारतीय वैज्ञानिक" हे पुस्तक अशाच प्रकारातील आहे.      
    या पुस्तकाबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे जुन्या काळात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची माहिती मोघम व अस्पष्ट नसून थोडक्यात पण अतिशय मुद्देसूद आहे.
    उदाहरणार्थ- "प्राचीन भारतीय खगोलविद आर्यभट्ट" मध्ये आर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याबाबत व पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा (डळवशीशरश्र ऊरू) काळ काढण्याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती देताना नमूद केले आहे की-
    "आर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याची पद्धत सांगून पृथ्वीचा परिध 24,835 मैल असल्याचे सांगितले. हा आकडा आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परिध काढून सर्वत्र मान्यताप्राप्त पृथ्वीच्या परिघापेक्षा (24,902 मैल) फक्त 0.2 टक्के कमी आहे.
    आर्यभट्टांनी त्यांच्या गणिताने पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा काळ 23 तास 56 मिनिटे 4.1 सेकंद ठरविला होता. त्याचा आधुनिक काळ 23 तास 56 मिनिटे 4.01 असल्याचे पाहून आर्यभट्टांच्या गणितातील अचूकता जाणवते. तसेच त्यांनी ठरविलेल्या नाक्षत्र वर्षाच्या काळात सध्याच्या मान्यताप्राप्त काळाच्या तुलनेत फक्त 3 मिनिटे 20 सेकंदाची चूक दिसते.
    ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध शल्यविशारद सुश्रुत यांच्याबाबतच्या माहितीत म्हटले आहे की, त्यांच्या "सुश्रुत संहिता" या  संस्कृत ग्रंथात 184 प्रकरणे असून त्यात 1120 आजारांची वर्णने आहेत. यात 120 प्रकरणात शस्त्रक्रियेची सविस्तर माहिती, इतर 64 प्रकरणात औषधांची माहिती आहे. तसेच औषधात वापरल्या जाणाऱ्या 700 वनस्पती, 64 खनिज आणि 57 प्राण्यांचीही सविस्तर माहिती आहे.
    शस्त्रक्रियेचे आठ प्रकार, पट्टीबंधनाचे (इरपवरसशी) चौदा प्रकार आणि शस्त्रक्रियेच्या शंभराहून जास्त उपकरणांचे वर्णनही "सुश्रुत संहितेत आहे."  
    पुस्तकातील सर्वच लिखाण असेच शास्त्र व आधार यांना धरून लिहिलेले आहे. या पुस्तकात खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट, वैद्यक शास्त्राचे सुश्रुत यांच्याशिवाय चरक, नागार्जुन, अणुसंकल्पनेचे जनक कणाद, गणितज्ज्ञ भास्काराचार्य या प्राचीन काळातील संशोधकांसोबतच आधुनिक काळात विविध क्षेत्रात संशोधक म्हणून मान्यताप्राप्त भारतीय संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस, सर सी. व्ही. रमण, श्रीनिवास रामानुजम, होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. जयंत नारळीकर अशा एकूण 25 संशोधकांचे जीवन आणि कार्य याबद्दल सखोल, सविस्तर व सचित्र माहिती आहे.
    पुस्तकाची भाषा गोष्ट सांगण्यासारखी सोपी आणि सहज समजणारी आहे.
    नचिकेत प्रकाशनाची अंतरबाह्य दर्जेदार निर्मिती आहे. मुखपृष्ठही कल्पक व आकर्षक झाले आहे. नव्या पिढीला वाचनाची सवय लागावी असा विचार गेल्या काही वर्षात जोर धरू लागला आहे. त्यात मुलांना वाढदिवस, मौंज किंवा सत्कार प्रसंगी पुस्तके भेट देण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्या भेट देण्याच्या पुस्तकांमध्ये ङ्गभारतीय वैज्ञानिकङ्घचा समावेश आवर्जून करायला हवा. उत्तम पुस्तकनिर्मितीसाठी लेखक व प्रकाशक दोघाचेही अभिनंदन.
नचिकेत प्रकाशन, नागपूर.                                                                            * विकास कुळकर्णी                 
 (पृ. 112 / किंमत 100 रुपये)
भ्र. 9225210130
      

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: