भावना ऋषि
लेखक : लेखक : प्रा. विजय यंगलवार
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 30.00 Rs.27.00

eBook Price : Rs. 30       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 24

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 50 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

वस्त्रोद्योगाचे प्रणेते असणारे आणि पद्‌मशाली समाजाला ही कुशलता शिकवून त्यांची एक कार्यप्रवण परंपरा तयार करणारे भावना ऋषी मृत्युंजय मार्कंडेय यांचे पुत्र आहेत. त्यांच्यावर मराठीतील हे पहिले व एकमेव पुस्तक सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे ते लिहिले आहे.

Reviews

वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी
कर्नाटक आणि आंध्रप्रदेशाला लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्रात बहुसंख्येने वसलेल्या व प्रामुख्याने विणकर व्यवसायात असलेल्या पद्मशाली समाजाचे आराध्य असलेले महर्षी भृगु आणि त्याच कुलपरंपरेतील मार्कंडेय ऋषी आणि भावना ऋषी यांच्यावर प्रा. विजय गोविंदराव यंगलवार यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेल्या तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच नागपूरच्या नचिकेत प्रकाशनने केले आहे. महर्षी भृगु, मृंत्युजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी नावाची ही तीन पुस्तके केवळ पद्मशाली समाजच नव्हे तर अन्यही समाजातील वाचकांच्या पौराणिक, सामाजिक आणि ऐतिहासिक माहितीत भर घालणारी आहेत.
आपल्या समाजाचे आपण काही देणे लागतो ही जाणीव खरे तर प्रत्येक माणसात आणि विशेषत: प्रत्येक शिक्षित माणसात असावयास हवी, पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे विविध रंगी, विविध ढंगी भारतीय समाजजीवनातील अनेक शाखांचा इतिहास, कर्तृत्व, परंपरा यांची माहितीच काय, अस्तित्व देखील नामशेष झालेले आहे. पण प्रा. यंगलवार यांनी प्रकर्षाने ही जाणीव ठेवून पद्मशाली समाजाचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. पद्मशाली यशोगाथा या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने पद्मशाली समाजाच्या सखोल अभ्यासाचा वसा घेतलेल्या प्रा. यंगलवार यांनी, त्या दिशेत पुढचे पाऊल टाकताना महर्षी भृगु मृत्युंजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी या तीन पुस्तकांची एक मालाच जणु समाजपुरुषाच्या गळ्यात टाकली आहे. अशा विषयांवर मान्यवर विद्वान लेखकांकडून मुद्दाम लिहून घेऊन ती पुस्तके प्रकाशित करून ही माहिती हे ज्ञान संपूर्ण समाजापर्यंत नेण्याचे जे धोरण नचिकेत प्रकाशन राबवित आहे त्यासाठी त्यांंचे अभिनंदन केले पाहिजे आणि अन्य समाज पुरुंषावरही त्यांच्याकडून अशीच पुस्तके प्रकाशित होतील. अशी अपेक्षा करू. या ही तीनही पुस्तके अतिशय उत्तम, दर्जेदार व देखणी झाली आहेत. सर्वच मुखपृष्ठ आकर्षक आहेत. दर्जेदार पुस्तकाची परंपरा नचिकेत ने कायम राखली आहे.
पद्मशाली समाजाची उत्पत्ती ज्यांच्यापासून झाली अशी प्रगाढ श्रद्धा या समाजात ज्यांच्याबद्दल आहे, त्या भावना ऋषी यांच्यावर आतापर्यंत फारशी माहिती उपलब्ध नव्हती. ती उणीव दूर करण्याचे अतिशय महत्वाचे काम प्रा. यंगलवार यांनी या पुस्तकाच्या रूपाने केले आहे. तसे हे अतिशय छोटेखानी पुस्तक असले तरी त्याचे संदर्भाच्या दृष्टीने महत्व फार मोठे आहे. एका पौराणिक कथेनुसार, कालवासुर नामक एका महाविनाशकारी राक्षसाचा वध ब्रह्मदेवाच्या वरदानाने केवळ अयोनिज वीराच्याच हातून घडणार होता. ब्रह्मचारी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञानंतर असा पुत्र यज्ञकुंडातून उत्पन्न झाला. त्याचे नाव भावनारायण. त्याने पुढे त्या राक्षसाचा व त्याच्या कुलाचा नाश केला. हा भावनारायणच पुढे भावना ऋषी म्हणून लौकिक मिळवता झाला. या भावनारायणाने कमलपुष्पाच्या देठापासून तंतू काढून त्याचे तलम वस्त्र तयार केले व ते भगवान विष्णूला अर्पण केले, अशीही एक कथा आहे. त्यावरून त्यांनी हातमागावर वस्त्र विणण्याची कला विकसित केली, हे स्पष्ट होते व म्हणूनच ते या कलेचे प्रणेते मानले जातात. ती कला पुढे त्यांच्या वंशजांनी वाढवली. त्याच योगाने या कुलाचा विस्तार होत पद्मशाली समाज निर्माण झाला. ही सारी कथा प्रा. यंंगलवार यांनी या पुस्तकात दिली आहे. पद्मशाली समाजबांधवांसाठी या तीनही पुस्तकांचे संदर्भमूल्य निश्चितपणे फार मोठे आहे. पण सर्वच समाजासाठी ते मोठे वाचनीय व प्रेरणादायी आहे.पृ. 32  किं.30 रू.
वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी : प्रा. विजय यंगलवार / पृ. 32  किं.30 रू
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130


About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: