चिरविजय भारतीय स्थलसेना
लेखक : लेखक : कर्नल अभय पटवर्धन
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 200.00 Rs.180.00

eBook Price : Rs. 200       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 168

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 200 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

वाचकांना स्थलसेनेची रचना, कार्य आणि उपलब्धींबद्दल सर्वंकष माहिती दिली आहे. स्थलसेने बद्दल ची सर्व माहिती वस्तुत: देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्याचमुळे या विषयात स्वारस्य असणाऱ्या तसेच अजाणतेपणानी इंडियन आर्मी आणि इंडियन आर्मड कोर्सेस यांच्यात गल्लत करणाऱ्या वाचकांना भारतीय स्थलसेनेच्या गौरवशाली इतिहास आणि वर्तमानबद्दल माहिती देण्यात हे पुस्तक सफल झाले आहे. भारतीय स्थलसेना जॉईन करण्याची कोणा तरूणांना इच्छा झाली तर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या सिलेक्शन प्रणाली बद्दल ही या पुस्तकात चर्चा केलेली आहे.

Reviews

चिरविजयी भारतीय स्थलसेना
भारतीय स्थलसेनेमध्ये मी 1966-2001 काळात 36 वर्ष सक्रीय सेवेत कार्यरत होतो. कुठल्याही ऑङ्गिसरची कमिशन नंतरची ही इच्छा असते की आपले युनिट कमांड करावे. त्या बाबतीत मी भाग्यवान होतो. त्या काळात तवांग च्या पुढे चिनी सीमारेषेवर दोन वर्षे आणि पंजाब मध्ये खलिस्तानी आतंक वाद्यांशी लढतांना एक वर्ष मला माझ्या शूर सैनिकांचे नेतृत्व करायची संधी मिळाली. या काळात माझ्या बटालियन ला ची" ऑ" आर्मी स्टा" त" “युनिट सायटेशन” ही मिळाले. माझी स्थलसेने मधील कारकीर्द ङ्गारच चांगली होती आणि परत संधी मिळाल्यास पुढील जन्मी सुद्धा मी स्थलसेनेतच जायला आनंदाने तयार होईन. माझे सुपुत्र सुद्धा स्थलसेनेमध्येच कार्यरत असून ही दुसरी पिढी संरक्षण दलात आहे, त्याचाही मला अभिमान आहेच.
नचिकेत प्रकाशन चे सर्वेसर्वा श्री. अनिल सांबरे यांच्या भारतीय संरक्षण दलांची माहिती सामान्य वाचकांपर्यंत पोहचावी या कळकळीच्या इच्छेमुळेच आणि त्यासाठी त्यांनी मला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे पुस्तक मूर्तीरूपाला येऊ शकले आहे. त्यांच्या बरोबर हे माझ दुसरं पुस्तक आहे. त्यांचे आभार मानणे आवश्यक आहे.
हे पुस्तक लिहितांना स्थलसेनेनी मला जे दिले त्याची थोडीङ्गार परतङ्गेड करण्याचे समाधान व आनंद तर आहेच पण वाचकांपर्यंत अचूक माहिती पोहचवून त्यांना स्थलसेनेची रचना, कार्य आणि उपलब्धींबद्दल सर्वंकष माहिती देण्याची नैतिक जबाबदारीही होती. मी स्वत: काँबँट आर्म मधील असल्यामुळे इंङ्गंट्री ला झुकते माप दिले गेले आहे. पण ते साहजिकही आहे. स्थलसेने बद्दल ची सर्व माहिती वस्तुत: देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे आणि त्याचमुळे या विषयात स्वारस्य असणार्‍या तसेच अजाणतेपणानी इंडियन आर्मी आणि इंडियन आर्मड कोर्सेस यांच्यात गल्लत करणार्‍या वाचकांना भारतीय स्थलसेनेच्या गौरवशाली इतिहास आणि वर्तमानबद्दल माहिती देण्यात मी सङ्गल झालो असेन तर त्यातच मला समाधान आहे. हे पुस्तक चाळल्यानंतर भारतीय स्थलसेना जॉईन करण्याची कोणा तरूणांना इच्छा झाली तर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या सिलेक्शन प्रणाली बद्दल ही या पुस्तकात चर्चा केलेली आहे.
पुस्तकात कुठलीही माहिती क्लासिङ्गाईड नाही आणि मी दिलेल्या माहितीची सत्यता इंटरनेटवर उपलब्ध असणार्‍या इंडियन आर्मीबद्दलच्या शेकडो-हजारो माहितीच्या तुकड्यांमधून दृष्टीगोचर होते, पडताळता येते.
वाचकांनी हा प्रयास गोड मानावा, ही विनंती
जय हिंद!!
कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)
 भ्र.: 9422149876

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: