नागपूर दर्शन
लेखक : लेखक : प्रा. विजय यंगलवार
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 60.00 Rs.54.00

eBook Price : Rs. 60       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 64

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

देशाच्या केंद्र व मध्यवर्ती असणारे नागपूर शहर व जिल्यातील पर्यटन स्थळाची नव्याने ओळख करून देणारे प्रथम व एकमेव पर्यटन पुस्तक. भरपूर माहिती, १६ पाने रंगीत, शहर व शहर जिल्हा नकाशा यासह कोणत्याही पर्यटकाला गाईड न घेता मार्ग दाखविणारे हे पर्यटन मित्र मार्गदर्शक या भूमिकेतील पुस्तक आहे.

Reviews

नागपूर दर्शन, श्रीक्षेत्र पैठण दर्शन
नचिकेतचे पर्यटन विषयक पुस्तके
पर्यटनाच्या दृष्टीने नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने लेखक प्रा. विजय यंगलवार यांची "नागपूर दर्शन" व "श्री क्षेत्र पैठण दर्शन" ही दोन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.
"नागपूर दर्शन" या पुस्तकातून लेखक प्रा. यंगलवार यांनी "विदर्भः इतिहास व पार्श्‍वभूमी" या मथळयांतर्गत विदर्भाचा प्राचीन इतिहास सांगत याला विदर्भ का म्हटले गेले आहे, याची मनोरंजक माहिती दिली आहे, तर "नागपूर जिल्हा : महत्वपूर्ण माहिती" या शीर्षकाखाली लेखकाने "नागपूर" या शब्दामागचा, शहरामागचा इतिहास उलगडून दाखविला आहे. इतकेच नव्हे तर नागपूर जिल्हयाचे भौगोलिक, प्राकृतिक, औद्योगिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिकदृष्टया असलेले महत्त्व स्पष्ट केले आहे.
नागपूर शहरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती, या स्थळांचे ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिक महत्त्व कथन केले आहे. अनेकदा असे होते की आपल्या घरी कोणी बाहेरगावची पाहुणे मंडळी आली तर त्यांना आपण आपल्या शहरातील महत्त्वाची स्थळे सुद्धा सांगू शकत नाही. अशावेळी नचिकेत प्रकाशन यांचे हे पुस्तक मदतीला जरूर धावून येते.

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: