Hrudhayachi Bhavfule
“हृदयाची भावफुले” हा वैद्य इंद्रायणीचा काव्यसंग्रह हा तिच्या आत्मचिंतनाचा आणि मनचिंतनाचा अविष्कार आहे. मायबोलीची सेवा घडावी आणि काव्यरूपाने ती सामान्यांच्या घराघरात पोचावी हा एवढाच प्रामाणिक उद्देश घेऊन एकोणचाळीस कविता कवियत्रीने रचलेल्या आहेत.
एकंदर एकोणचाळीस कवितांचा हा गुलदस्ता बत्तीस कविता मुक्तछंदामध्ये आणि सात अन्वय ...... सुगंधित करण्यात कवियत्रीला .... यश आलेले आहे. अन्वय म्हणजे कवितेच्या ओळी गद्यस्वरूपात लिहणे आणि हा प्रकारच्या कविता लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न कवयित्रीने केलेला दिसतो.
“हृदयाची भावफुले” हे कविता संग्रहाचे नाव सुद्धा समर्पक दिलेले आहे. हृदयात उठणार्या अनेक भावतरंगांना मोकळ्या दिशा प्रदान करण्यात कवयित्रीने कसब दाखविले आहे. ही भावफुले खालील पाच भावांमध्ये वर्गकृत केल्या जाऊ शकतात.





Featured Products



New Products
- Banking
- Informative
- Science & Technology
Latest News
No results found...