Description
“मराठीतून जर्मन – शिकणं आता सौपं”
“भाषा ही फक्त संवादाचं साधन नाही ती नव्या संस्कृतीकडे आणि नव्या संधींकडे नेणारं दार आहे.”
आज अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की “जर्मन भाषा गुरु” हे पुस्तक अधिकृतपणे प्रकाशित होत आहे. हे पुस्तक खास मराठी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले आहे, जे जर्मन भाषा शिकू इच्छितात पण इंग्रजी माध्यमामुळे अडचण अनुभवतात. आता मराठी माध्यमातूनही तुम्ही सहजपणे आणि आत्मविश्वासाने जर्मन शिकू शकता “मराठी माध्यमातून सोपं जर्मन शिका !”
या पुस्तकात तुम्हाला मिळेलः
जर्मन अक्षरमाला आणि योग्य उच्चार शिकण्यासाठी सोपी उदाहरणे
मराठी भाषेतून स्पष्ट केलेले व्याकरण आणि नियम
会 दैनंदिन संभाषणासाठी वापरता येणारी वाक्यरचना
शब्दसंग्रह वाढवण्यासाठी उपयुक्त यादी आणि सराव तक्ते
जर्मन संस्कृती, शिक्षण पद्धती आणि रोजगाराच्या संधींचं मार्गदर्शन
हे पुस्तक कोणासाठी आहे?
परदेशात शिक्षण किंवा नोकरीचं स्वप्न पाहणारे मराठी विद्यार्थी
नवशिके जर्मन शिकणारे आणि भाषा शिकण्यात रस असलेले वाचक
तांत्रिक आणि व्यावसायिक क्षेत्रात जर्मनची गरज असलेले युवक
आणि सर्वजण जे “मराठी विचारसरणीतून परदेशी भाषा आत्मसात” करू इच्छिता
जर्मन शिका आपल्या भाषेतून










Nisargatil Vidnyan
Kho-Kho
Jag Jahiratiche
Nagari Bankansathi Sahakari Paripatrake