Suvachne Tukobanchi

200.00

श्री सार्थ तुकाराम गाथा म्हणजे पाचवा वेद. गाथेचा लौकिक जीवनाशी जवळचा संबंध आहे. प्रत्येकाचे जीवन सुखी, समाधानी करण्याची ताकद प्रत्येक अभंगांमध्ये आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात, प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी प्रत्येकाकडून गाथा वाचन होणे गरजेचे आहे. गाथेतील निवडक अभंगातील विचार तसेच गाथेतील वैज्ञानिक संकल्पना यांना उजाळा देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. तरुणांनी गाथा वाचावी व जीवन सुखी, समाधानी करावे

5 in stock

SKU: 583 Category:
Description

Description

जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. विविध उपक्रमांमधून जगद्गुरूंचे विचार घरोघरी पोहोचले आहेत. वास्तववादी, प्रयत्नवादी जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या सदगुरु तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे जीवन जगण्याची शिदोरी आहे.
श्री सार्थ तुकाराम गाथा म्हणजे पाचवा वेद. गाथेचा लौकिक जीवनाशी जवळचा संबंध आहे. प्रत्येकाचे जीवन सुखी, समाधानी करण्याची ताकद प्रत्येक अभंगांमध्ये आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात, प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी प्रत्येकाकडून गाथा वाचन होणे गरजेचे आहे. गाथेतील निवडक अभंगातील विचार तसेच गाथेतील वैज्ञानिक संकल्पना यांना उजाळा देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. तरुणांनी गाथा वाचावी व जीवन सुखी, समाधानी करावे यासाठीची ही धडपड !!!

Additional information

Additional information

Weight 0.2 kg
Dimensions 24 × 16 × 3 cm
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Suvachne Tukobanchi”

Your email address will not be published. Required fields are marked *

More Products

Vicharancha Canvas

250.00

“विचारांचा कॅनव्हास” हे पुस्तक म्हणजे डॉ. नीता देशपांडे यांचा अनुभव, आत्मचिंतन आणि जीवनदृष्टी यांचा सुरेख संगम आहे. या लेखसंग्रहातील प्रत्येक लेख, हा केवळ शब्दांचा संच नाही, तर विचारांचा एक सखोल प्रवास आहे — जिथे वाचकाला स्वतःचा आरसा दिसतो.
शिकत असताना आणि शिकवताना आलेले अनुभव, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उमजलेली मनोवृत्ती, समाजातील बदलती मूल्यव्यवस्था आणि लहानपणाच्या आठवणींमधून साकारलेले विचार, हे सारे या पुस्तकाच्या पानोपानी जिवंत भासते. लेखिकेची भाषा ही सहज, सोपी आणि तरीही हृदयाला भिडणारी आहे. हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करणारे, विचारांना चालना देणारे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक करणारे ठरेल, अशी खात्री आहे.

Shree Chaitanya Mahaprabhu

30.00

At The Eastern side of India there lived a saint, called Chaitanya Mahaprabhu, who was a devotee of Lord Krishna; who devoted whole of his life for devotion of Krishna and propagated this cult in the Indian society. The people of Maharashtra don?t know much about this sacred saint. The book is written for the children.

Bhartiya Nobel Vijete

125.00

Noble Prize is the most prestigious honour in the world. The Indian who have won this prize. So far has been accounted in this book with their premising work for the benefit of the mankind.

Vyavasay Vyavasthapan

250.00

This book is focused for the use in financial institutions particularly policy, fund, deposit, loan, collection, investment, works, accounting, assembly or meeting, customer, marketing, danger, branch, time and others 20 items management is discussed in this book. A sort of check-list can be got through it. The highest medium and lower management skills are included.

Shikshanachi Vatchal

100.00

शिक्षणाची वाटचाल हे पुस्तक विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी आहे. सौ. अर्चना घोरमाडे या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून त्यांचे पती श्री सुरेंद्र घोरमाडे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचे मूळ गाव नागपूर (ग्रामीण) तहसील येथील चिचोली (फेटरी) आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक कार्य केले. गरीब कुटुंबात जन्मलेल्या पती-पत्नीने अनेक संकटांना तोंड देऊन यशस्वीपणे रिषभ व क्षितिज या दोन मुलांचे संगोपन केले. अत्यंत कठीण प्रसंगात देखील शिक्षणास प्राधान्य देत विविध अनुभवांद्वारे नीती मूल्यांचे संस्कार करून त्यांना सुजाण नागरिक केले. सौ.अर्चना यांच्या धाडसाची आणि कष्टाची ही कथा मातृत्वाच्या आणि पालकत्वाच्या कर्तव्याला तसेच नैतिक मूल्यांच्या अस्तित्वाला अधोरेखित करते. पवित्र विचारांनी सुंदर झालेल्या या पुस्तकास लेखिका सौ. अर्चना सुरेंद्र घोरमाडे यांनी शब्दबद्ध केले आहे.