Tahanlela Bet

375.00

महेश लातूरकर हे रहस्यकथा लेखक आणि इतिहास अभ्यासक असून प्रस्तुत पुस्तक हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे.
त्यांनी लिहिलेल्या “शापित सौंदर्य” या गाजलेल्या रहस्यमय भय कादंबरीच्या दोन आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. याच पुस्तकाकरिता त्यांना “भारतीय समाज विकास अकादमी” चा सन 2012 वर्षाचा उत्कृष्ट लेखक या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
त्यांचे शिक्षण एम. कॉम ( फायनान्स ) आणि पीजी. डी. एफ. एम ( मुंबई विद्यापीठ ) असे झालेले आहे. तसेच यांना ज्योतिषाची आवड असून त्यांनी संशोधनात्मक “ज्योतिष आचार्य” आणि “अंकशास्त्रज्ञ” या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, या विषयांमध्ये ते पारंगत आहेत.
सध्या ते मागील काही वर्षापासून “छत्रपती संभाजी महाराज” यांच्या पूर्ण जीवनावर आधारित ऐतिहासिक कादंबरी लिहित आहेत.
लेखनासोबतच ते मराठी भाषा, मराठी शाळा आणि इतिहास संवर्धन, जतन संबंधित विविध संघटनांशी आणि चळवळीशी प्रत्यक्ष सहभागी असून कार्यरत आहेत.

SKU: 589 Category:
Description

Description

तहानलेलं बेट ही एक अत्यंत उत्कंठावर्धक आणि गूढ रहस्यमय कादंबरी असून यात लेखकांनी रहस्य आणि थरार यांचा सुरेख संगम साधला आहे.
निसर्गाच्या नियमित चक्राला आव्हान देण्याचं साहस करण्यात विज्ञान काही प्रमाणात यशस्वी होत असलं तरी त्याला बऱ्याच मर्यादा आहेत.
अनाकलनीय घडणाऱ्या घटनांचा वेध घेत कथानकातील पात्र एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबतात, तेथून ते स्वतःचाच गत इतिहास गुपित काळाच्या प्रवाहात उलगडत जातात, याच धक्कादायक वळणावर सुरू होत एक द्वंद, मानवी स्वभाव, भावना, लोभ, कुतूहल आणि दैवी चमत्कार.
प्रस्तुत कादंबरी रहस्य, प्रेम, द्वेष, नात्यांची गुंतागुंत आणि अशक्यप्राय साहस यांनी गुंफलेली आहे ती वाचकांना एक अनोखा आणि रोमांचक अनुभव देईल.

Additional information

Additional information

Weight 0.300 kg
Dimensions 24 × 16 × 3 cm
More Products

Shree Ganesh Mahatma

90.00

The information about the God Ganesh has been compiled in this book. Besides the Major places of pilgrimage of Ganesh have also given. The devotees get all the in their minds about God Ganesh answered thereby.

Stree Vividha

70.00

Some incidents in the lives of the historical women, the factors relating to their health, competitions and beauty contest of and other aspects has been provided in this book. The achievements women got in different fields of life have also been described.