Tahanlela Bet

375.00

महेश लातूरकर हे रहस्यकथा लेखक आणि इतिहास अभ्यासक असून प्रस्तुत पुस्तक हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे.
त्यांनी लिहिलेल्या “शापित सौंदर्य” या गाजलेल्या रहस्यमय भय कादंबरीच्या दोन आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. याच पुस्तकाकरिता त्यांना “भारतीय समाज विकास अकादमी” चा सन 2012 वर्षाचा उत्कृष्ट लेखक या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
त्यांचे शिक्षण एम. कॉम ( फायनान्स ) आणि पीजी. डी. एफ. एम ( मुंबई विद्यापीठ ) असे झालेले आहे. तसेच यांना ज्योतिषाची आवड असून त्यांनी संशोधनात्मक “ज्योतिष आचार्य” आणि “अंकशास्त्रज्ञ” या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, या विषयांमध्ये ते पारंगत आहेत.
सध्या ते मागील काही वर्षापासून “छत्रपती संभाजी महाराज” यांच्या पूर्ण जीवनावर आधारित ऐतिहासिक कादंबरी लिहित आहेत.
लेखनासोबतच ते मराठी भाषा, मराठी शाळा आणि इतिहास संवर्धन, जतन संबंधित विविध संघटनांशी आणि चळवळीशी प्रत्यक्ष सहभागी असून कार्यरत आहेत.

SKU: 589 Category:
Description

Description

तहानलेलं बेट ही एक अत्यंत उत्कंठावर्धक आणि गूढ रहस्यमय कादंबरी असून यात लेखकांनी रहस्य आणि थरार यांचा सुरेख संगम साधला आहे.
निसर्गाच्या नियमित चक्राला आव्हान देण्याचं साहस करण्यात विज्ञान काही प्रमाणात यशस्वी होत असलं तरी त्याला बऱ्याच मर्यादा आहेत.
अनाकलनीय घडणाऱ्या घटनांचा वेध घेत कथानकातील पात्र एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबतात, तेथून ते स्वतःचाच गत इतिहास गुपित काळाच्या प्रवाहात उलगडत जातात, याच धक्कादायक वळणावर सुरू होत एक द्वंद, मानवी स्वभाव, भावना, लोभ, कुतूहल आणि दैवी चमत्कार.
प्रस्तुत कादंबरी रहस्य, प्रेम, द्वेष, नात्यांची गुंतागुंत आणि अशक्यप्राय साहस यांनी गुंफलेली आहे ती वाचकांना एक अनोखा आणि रोमांचक अनुभव देईल.

Additional information

Additional information

Weight 0.300 kg
Dimensions 24 × 16 × 3 cm
More Products

Dhanya Hi Gondvale Nagari

90.00

Gondawale is a place, where a yogi disciple gondawalekar Maharaj lived and has made the place consecrated. The full devotional attitude of the writer has guided the reader about the way how to devote himself to this shrine.

The Game of Affair

369.00

प्रेमभावना ही जीवनाची संजीवनी आहे. सहजपणे एकमेकांत मिसळून-समरसून जगण्याचा भावमूलक अध्याय आहे. म्हणूनच प्रेमाच्या वेदनेकडेसुद्धा सौंदर्यवादाच्या भूमिकेतून पाहिले जाते. परंतु प्रेमाच्या आणा-भाका घेतल्यावरही लग्नासारख्या पवित्र बंधनातून बाहेर पडून लग्नबाह्य संबंध ठेवणे, त्याला प्रेमाचे गोंडस नाव देऊन त्याच्या अस्तित्वासाठी वाट्टेल तसे वागणे, वासना व भावना यातील अंतर न कळणे आणि केलेल्या चुका पुन्हा दुरुस्त करण्याच्या आविर्भावातून नात्याची वीण घट्ट करण्याची उठाठेव करणे; असे कित्येकदा समाजजीवनात अनुभवायला मिळते. हेच वास्तवभान उर्मिला देवेन यांनी  ‘द गेम ऑफ अफेअर’ या कादंबरीत मार्मिकपणे मांडले आहे.

Swami Vivekanand Jivan Sutre

30.00

This is the compilation of the inspring though of Swami Vivekanand in an assigned book for us, which can be read anywhere at any time. It imparts encouragement to the dejected, stretches one from the complex and creates the how of encouragement in his being develops self confidence in his mind. In a way is a full proof remedy for sure success.