Tahanlel Bet

₹375.00

महेश लातूरकर हे रहस्यकथा लेखक आणि इतिहास अभ्यासक असून प्रस्तुत पुस्तक हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे.
त्यांनी लिहिलेल्या “शापित सौंदर्य” या गाजलेल्या रहस्यमय भय कादंबरीच्या दोन आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. याच पुस्तकाकरिता त्यांना “भारतीय समाज विकास अकादमी” चा सन 2012 वर्षाचा उत्कृष्ट लेखक या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
त्यांचे शिक्षण एम. कॉम ( फायनान्स ) आणि पीजी. डी. एफ. एम ( मुंबई विद्यापीठ ) असे झालेले आहे. तसेच यांना ज्योतिषाची आवड असून त्यांनी संशोधनात्मक “ज्योतिष आचार्य” आणि “अंकशास्त्रज्ञ” या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, या विषयांमध्ये ते पारंगत आहेत.
सध्या ते मागील काही वर्षापासून “छत्रपती संभाजी महाराज” यांच्या पूर्ण जीवनावर आधारित ऐतिहासिक कादंबरी लिहित आहेत.
लेखनासोबतच ते मराठी भाषा, मराठी शाळा आणि इतिहास संवर्धन, जतन संबंधित विविध संघटनांशी आणि चळवळीशी प्रत्यक्ष सहभागी असून कार्यरत आहेत.

SKU: 589 Category:
Description

Description

तहानलेलं बेट ही एक अत्यंत उत्कंठावर्धक आणि गूढ रहस्यमय कादंबरी असून यात लेखकांनी रहस्य आणि थरार यांचा सुरेख संगम साधला आहे.
निसर्गाच्या नियमित चक्राला आव्हान देण्याचं साहस करण्यात विज्ञान काही प्रमाणात यशस्वी होत असलं तरी त्याला बऱ्याच मर्यादा आहेत.
अनाकलनीय घडणाऱ्या घटनांचा वेध घेत कथानकातील पात्र एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबतात, तेथून ते स्वतःचाच गत इतिहास गुपित काळाच्या प्रवाहात उलगडत जातात, याच धक्कादायक वळणावर सुरू होत एक द्वंद, मानवी स्वभाव, भावना, लोभ, कुतूहल आणि दैवी चमत्कार.
प्रस्तुत कादंबरी रहस्य, प्रेम, द्वेष, नात्यांची गुंतागुंत आणि अशक्यप्राय साहस यांनी गुंफलेली आहे ती वाचकांना एक अनोखा आणि रोमांचक अनुभव देईल.

Additional information

Additional information

Weight 0.300 kg
Dimensions 24 × 16 × 3 cm
More Products

Lekha Parikshan & Sabha vyavasthapan

₹300.00

The audit examination and management of meetings are the subjects on which full information can be gained through this boom. It is particularly useful for financial co-operative institutions.

Yogini

₹80.00

Poetry having expression of the young pulsating heart by Prof. Manoj A. Dhanvijay.

Shabdanch jagan

₹150.00

प्रा. सुरेश माधवराव नारायणे मुळ विंचूरचे पण आता नांदगाव जि. नाशिक येथील हे संवेदनशील आणि जीवनाभिमुख लेखन करणारे कवी आहेत. बालपणापासूनच आलेल्या संघर्षांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला आणि त्या अनुभवांचं प्रतिबिंब त्यांच्या लेखणीत स्पष्टपणे दिसून येतं. त्यांचे मनोमनी ललित लेख संग्रह आणि काव्य झुला काव्यसंग्रह वाचकांच्या साठी एक साहित्यिक शिदोरी ठरली आहे. आता हे तिसरे […]

Chirvijay Bhartiya Sthalsena

₹200.00

In this book the reader is enlightened about the structure, work and advantages of the military. Those who are interested in this subject would get ample information and others too will enjoy the reading for general Knowledge sake. One will be able to differentiate in Indian Army and in armed forces and know about the history and present day positions of army. Reading of the book may inspire and motivate the youth to join military. The book has also discussed the methods of selection of the Army by colonal Abhya Patwardhan

Jagatik Jantu Shastradnya

₹160.00

The progress of modern science is based on the contribution of the microbe scientists. Modern science of medicine and vaidakshastra / surgery is supported through the research made by microbe scientists who had worked continuously for their research are respected for their knowledge got through mysterious ways.