Description
सुवचने तुकोबांची पुस्तक परिचय :-
श्री सार्थ तुकाराम गाथेमध्ये जवळपास चार हजार पाचशे अभंग आहेत. त्यातील निवडक अभंगाचा काही भाग घेऊन त्यातील वैयक्तिक व विश्वात्मक मूल्ये, पदार्थाचे भौतिक गुणधर्म, प्रकाशाचे परावर्तन व अपवर्तन, द्रावणाचे विविध प्रकार, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, जलचक्र, प्रतिध्वनी, न्यूटनचे गतीविषयक नियम यासारख्या वैज्ञानिक संकल्पना एकत्रित करण्याचे काम केले आहे. तरुणांनी गाथा वाचावी, त्यातील काळानुसार सुसंगत विचार स्वीकारून जीवन सुखी व समाधानी करावे यासाठी केलेली ही धडपड.













