Description
श्री राजीव हिंगवे
श्री राजीव हिंगवे, हे सिव्हिल इंजिनियर असून ते गेली 40 वर्षे बांधकाम व्यावसायिक (Builder) म्हणून नागपूर, पुणे येथे प्रख्यात आहेत. मराठी वाचनाच्या आवडीमुळे 2022 मध्ये त्यांनी मराठीत M.A केले व सध्या PhD ची तयारी अंतिम टप्यावर आली आहे.
श्री राजीव हिंगवे मागील चाळीस वर्षांपासून आ. बाबासाहेबांशी एक भक्त म्हणून जुळले आहेत व त्यांच्या मार्गदर्शनात अनेक अध्यात्मिक उपक्रम, उत्सव, कार्यक्रम यांचे त्यांनी आयोजन केले आहे. श्री शांतिपुरूष मासिकाचे ते गेली 25 वर्षे कार्यकारी संपादक म्हणून कार्य करीत आहेत. आज देश विदेशात हजारो भाविक या मासिकाचे सभासद आहेत. श्री शांतिपुरूष सेवा संस्थेचे ते कार्यकारी अध्यक्ष असून या संस्थेचे कार्य समर्थपणे सांभाळीत आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे चैतन्यपीठाचे युट्युब चॅनेलवर गेली 6 वर्षे सुरु असलेली आ. बाबासाहेबांचा आत्मसंवाद, या प्रबोधन मालिकेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.














Aapli Sanskruti